भारतीय राष्ट्रीय चळवळीतील क्रांतिकारी चळवळ

भारतीय राष्ट्रीय चळवळीतील क्रांतिकारी चळवळ | Revolutionary movement in theIndian national movement

क्रांतिवादी तरुणांना असे वाटत होते की अर्ज, विनंत्या व शिष्टमंडळ यामुळे ब्रिटिश सरकारमध्ये परिवर्तन होणार नाही व देशासाठी प्राणत्याग करण्याची त्यांची तयारी होती. तसेच ब्रिटिशांच्या शस्त्राला शस्त्राने उत्तर दिले पाहिजे, अशी त्यांची विचारसरणी होती.

भारतातील क्रांतिकारी चळवळीचा प्रारंभ महाराष्ट्रात झालेला दिसतो आणि त्यातही पुणे जिल्ह्यातील चित्पावन ब्राह्मण आघाडीवर दिसतात. असे 1918 च्या सेडिशन कमिटीच्या अहवालात म्हटले होते, हे ब्राह्मण शिवाजी महाराज व शाहूंच्या पेशव्यांचे वंशज होते.

युगांतर या बंगाली साप्ताहिकातून 22 एप्रिल 1906 रोजीच्या अंकात अरविंद घोष यांचे बंधू बारींद्र घोष यांनी तपशीलवार कार्यक्रम सुचविला होता. तोच महाराष्ट्र व पंजाबमधील क्रांतिकारकांचा कार्यक्रम होता.

बंगालची क्रांतिकारी चळवळ

1. अनुशीलन समिती

या समितीची स्थापना पी. मित्रा यांनी केली होती. या चळवळीचे उद्दिष्ट फक्त बंगालची फाळणी रद्द करवून घेणे नव्हे तर स्वराज्यप्राप्ती हेही होते. अनुशीलन समितीत बिगर हिंदूंना प्रवेश नसे. तसेच शारीरिक शिक्षणावर भर दिला होता. अशीच समिती जतिंद्रनाथ बॅनर्जी यांनी कलकत्याला उभारली. नंतर यात बा. कुमार घोष (अरविंद कुमार घोष यांचे बंधू), भूपेंद्रनाथ दत्त हे सामील झाले. या समितीत अनेक तरुण सामील झाले. सर्व बंगालमध्ये 500 च्या आसपास शाखा होत्या. कालीमाता हे भारतमातेचेच रूप असून तिची पूजा प्राणाहुतीने बांधावी लागेल, हा विचार त्यांनी तरुणांमध्ये रुजविला.

2. माणिकतोळा कट

अनुशीलन समितीचे हेमचंद्र दास आपल्या संपत्तीचा काही भाग विकून युरोपला गेले व तेथून बॉम्ब तयार करण्याची पद्धत शिकून आले. उल्हास दत्त ज्यांना बॉम्ब तयार करणे माहीत होते, ते देखील अनुशीलन समितीत आले आणि या दोघांच्या मार्गदर्शनात कलकत्याजवळील माणिकतोळा उद्यानाजवळ बॉम्ब तयार करण्याचा उपक्रम सुरू झाला. येथे तरुणांना बॉम्ब, पिस्तूल व अन्य हत्यारे वापरण्याचे प्रशिक्षणदेखील दिले जाऊ लागले.

3. अधिकाऱ्यांच्या हत्या

1907 पासून अनुशीलन समितीने या शिक्षणाचा प्रत्यक्ष प्रयोग ब्रिटिश अधिकाऱ्यांवर सुरू केला. पूर्व बंगालचा लेफ्टनंट गव्हर्नर बामफील्ड फुल्लर याच्या हत्येच्या अयशस्वी प्रयत्नाने सुरुवात झाली. नंतर बंगालमध्ये अधिकाऱ्यांच्या हत्येचे सत्र सुरू झाले. 1917 पर्यंत जवळपास 64 अधिकाऱ्यांना ठार केले, 12 बॉम्बहल्ले केले. या समितीने तुर्कस्तान, इराण व अफगाणिस्तानमधून शस्त्रास्त्रे गुप्तपणे भारतात आणली होती.

4. मुझफ्फरपूरच्या हत्या

तेव्हाचा तत्कालीन मुझफ्फरपूरचा न्यायाधीश किंग्जफोर्ड याने छोट्या गुन्ह्यांसाठी युवकांना मोठमोठ्या शिक्षा दिल्या होत्या. त्याचा बदला घेण्यासाठी प्रफुल्ल चाकी व खुदिराम बोस यांनी त्याच्यावर बॉम्ब फेकला पण त्यात दोन इंग्रज स्त्रिया ठार झाल्या.

खुदीराम बोस - विकिपीडिया

खुदिराम बोसला अटक करून फाशी देण्यात आली, तेव्हा तो फक्त 15 वर्षांचा होता. प्रफुल्ल चाकी याने स्वतःवर गोळी झाडून घेतली.

5. अलीपूर खटला

मुझफ्फरपूर प्रकरणाचा तपास करत असताना माणिकतोळा उद्यानातील बॉम्बचा कारखाना सापडला. तेथून व कलकत्त्यातून एकूण 34 जणांना अटक करण्यात आली. त्यात अरविंद घोष व बारींद्र कुमार घोष होते. हा खटला अलीपूर खटला म्हणून प्रसिद्ध होता. कारण तो अलीपूरच्या न्यायालयात चालविला गेला. खटल्यातील सरकारी वकिलाला फेब्रुवारी 1909 मध्ये च पोलीस उपाधीक्षकाला फेब्रुवारी 1910 मध्ये न्यायालयाच्या परिसरातच मारण्यात आले. फितूर झालेला व माफीचा साक्षीदार बनलेल्या नरेंद्र गोस्वामीची हत्या कन्हैयालाल दत्त व सत्येन बोस यांनी तुरुंगात हत्या केली. कन्हैयालाल दत्त यावेळी 18 वर्षांचा होता. त्याला फाशीची शिक्षा झाली. त्याच्या अंत्यविधीला अफाट गर्दी झाली. या खटल्यात अनेकांना जन्मठेप व फाशी झाली. पुराव्याअभावी अरविंद घोष यातून सुटले.

6. ढाका अनुशीलन समिती

मुझफ्फरपूर प्रकरणानंतर पुलीन बिहारी दास यांनी अनुशीलनचे नेतृत्व हाती घेतले. यात अनेक योजना बनविण्यात आल्या. 1910 साली 90 क्रांतिकारकांना अटक करून हावरा व ढाका कट खटल्यात गोवण्यात आले. या संघटनांमार्फत इराण, अफगाण, तुर्कस्तानसारख्या राष्ट्रांतून शस्त्रास्त्रे गुप्तपणे देशात आणली गेली.

7. चितगाव कट 1930

बंगालमधील सरकारच्या चितगाव शस्त्रागारावर शेकडो क्रांतिकारकांनी हल्ला केला. या कटाची योजना हिंदुस्थान सोशालिस्ट आर्मीने तयार केली. स्त्रियांचा सहभाग हे या कटाचे वैशिष्ट्य.

8. मास्तर दा सूर्यसेन

चितगाव येथील राष्ट्रीय शाळेत सूर्यसेन हे शिक्षक होते. 1929 साली चितगाव जिल्हा काँग्रेस समितीचे ते अध्यक्ष होते. रवींद्रनाथ टागोर व काझी नझरूल इस्लाम यांचे ते चाहते होते. त्यांच्या क्रांतिकारी गटात अनंतसिंग, गणेश घोष व तोकनाथ पाल यांचा सहभाग होता. चितगाव कटाची योजना आखण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

9. रासबिहारी बोस

राश बिहारी बोस - विकिपीडिया

1912 साली ब्रिटिशांनी कलकत्त्याहून दिल्ली येथे राजधानी आणली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात हार्डिंग्जवर घोष यांनी हल्ला केला. हार्डिंग्ज वाचला पण त्याचा ए. डी. सी. ठार झाला. रासबिहारींना पकडण्यासाठी 7500 रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले. पण त्यांना पकडण्यात सरकारला अपयश आले.

पंजाबमधील क्रांतिकारी चळवळ

1. 1904 साली सहारनपूर येथे गुप्त क्रांतिकारी संस्था स्थापन झाली. लाला हरदयाळ, अजितसिंग व अंबाप्रसाद ही मंडळी यात सामील होती. 1911 साली लाला हरदयाळ अमेरिकेत गेल्यानंतर पंजाबमधील क्रांतिकाऱ्यांच्या नेतृत्वाची सूत्रे रासबिहारी बोस यांच्याकडे आली.

2. लाहोर कट खटला (1913) – लाहोरमधील लॉरेन्स बागेजवळ 1913 साली झालेल्या बॉम्बस्फोटाच्या आधारे हा खटला सुरू झाला. बात अमरचंद बालमुकुंद व वसंतकुमार विश्वास यांना फाशीची शिक्षा झाली. रासबिहारी बोस कमी शिक्षेनंतर सुटले. 21 फेब्रुवारी हा उठावाचा दिवस ठरला होता. कृपालसिंग या गुप्तहेराने या कटाची बातमी सरकारला दिली. त्यामुळे अनेकांची धरपकड झाली, फाशी व जन्मठेपेच्या शिक्षा देण्यात आल्या.

3. भगतसिंग (1907-1931) – भगतसिंग यांचे काका अजितसिंग हे देखील प्रसिद्ध क्रांतिकारक होते. प्राथमिक शिक्षण बंग येथे घेऊन भगतसिंग लाहोरच्या डी. ए. व्ही. व पुढे नॅशनल महाविद्यालयामधून बी. ए. (1923) झाले. डी. ए. व्ही. महाविद्यालयमध्ये असतानाच त्यांनी विद्यार्थ्यांची संघटना उभारण्यात पुढाकार घेतला आणि आजन्म अविवाहित राहून स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याची शपथ घेतली. त्यांनी प्रारंभीच्या काळात काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता परंतु त्यांना काँग्रेसचे तत्कालीन धोरण काही रुचले नाही. हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (HRA) या संघटनेत ते दाखल झाले. त्यांची लवकरच मध्यवर्ती समितीचे सचिव म्हणून नियुक्ती झाली.

भगत सिंह
भगत सिंह

1926 मध्ये पंजाब नौजवान सभा त्यांनी स्थापन केली. यासाठी सुखदेव, चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त, भगवती चरण, जतींद्रनाथ दास आदींचे सहकार्य त्यांनी घेतले. या संघटनेच्या शाखा ग्रामीण भागातदेखील होत्या.

सायमन कमिशनच्या विरोधात लाहोर येथे लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली निदर्शन झाली. त्यावेळी झालेल्या लाठी हल्ल्यात लालाजी घायाळ झाले आणि त्यातच नंतर त्यांचे निधन झाले. लालाजींच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगतसिंग व राजगुरू यांनी जे. पी. साँडर्सचा खून (17) डिसेंबर 1928) केला.

ऑक्टोबर 1924 4. हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन मध्ये सर्व क्रांतिकारी संघटनांचे अधिवेशन कानपूरला बोलविण्यात आले. यात सचिंद्रनाथ संन्याल, योगेशचंद्र चॅटर्जी, राम प्रसाद बिस्मिल या जुन्या क्रांतिकारकांसोबतच भगतसिंग, शिव शर्मा, सुखदेव, भगवतीचरण व्होरा, चंद्रशेखर आझाद हे तरुण क्रांतिकारकदेखील होते. यावेळी ‘हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन’ (HRA) ही संघटना स्थापन झाली. 1925 च्या काकोरी कटात या संघटनेचे अनेक जण सहभागी होते.

४. काकोरी कट (1925) – क्रांतिकार्यासाठी धनाची आवश्यकता होती. ते मिळविण्यासाठी क्रांतिकारकांनी खजिना लुटण्याचे ठरविले. चंद्रशेखर आझाद, राम प्रसाद बिस्मिल, राजेंद्रनाथ लाहिरी, रोशनसिंग आदींनी काकोरी कटाची योजना आखली होती. सहारनपुर लखनौ मार्गावरील काकोरी येथे 9 ऑगस्ट 1925 रोजी रेल्वे अडवून लुटण्यात आली. राम प्रसाद बिस्मिल, राजेंद्रनाथ लाहिरी, रोशनसिंग, अशफाकउल्ला खान यांना ब्रिटिशांनी फाशी दिली. चंद्रशेखर आझाद सरकारच्या हाती लागले नाहीत.

५. हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन – दिल्ली येथे झालेल्या बैठकीत सप्टेंबर 1928 मध्ये या संघटनेची स्थापना झाली. या संघटनेच्या स्थापनेत भगतसिंह यांचा पुढाकार होता. बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली, मद्रास या प्रांतांत तिच्या शाखा स्थापन झाल्या.

६. कायदेमंडळात बॉम्बस्फोट

या काळात कायदेमंडळात दोन विधेयके पारित होणार होती.

अ. ट्रेड डिस्प्यूट बिल, जे कामगारांच्या संप करण्याच्या हक्कावर गदा आणणारे होते.

ब. पब्लिक सेफ्टी बिल, जे परराष्ट्राशी गुप्त संबंध ठेवणा-यांना कायद्याचे शासन करता यावे यासाठी होते.

या दोन्ही बिलांचा निषेध म्हणून बटुकेश्वर दत्त व भगतसिंग यांनी दिल्लीच्या केंद्रीय विधानसभेच्या सभागृहात 8 एप्रिल 1929 रोजी बॉम्ब फेकले, हवेत गोळ्या झाडल्या व निषेधपत्रके फेकली. त्यानंतर दोघेही ‘इन्कलाब जिंदाबाद’ अशा घोषणा देत सरकारच्या स्वाधीन झाले.

यावेळी सभागृहात अध्यक्ष विठ्ठलभाई पटेल, मोतीलाल नेहरू, मुहम्मद अली जिना, न चि केलकर, जयकर, मदन मोहन मालवीय, बमनजी दलाल आदी खासदार सभागृहात बसले होते. सायमन कमिशनचे जॉन सायमन हे देखील विधेयकावरील चर्चा ऐकण्यासाठी अध्यक्षांच्या गॅलरित बसलेले होते. बॉम्बस्फोटामुळे जखमी झालेल्यांमध्ये गृहमंत्री सर जॉर्ज शुस्टर आणि सरकारी सभासद बमनजी दलाल हे होते.

यावेळी त्यांनी सभागृहात फेकलेल्या निषेधपत्रात म्हटले होते की, बहिऱ्यांना ऐकू जाये म्हणून मोठा आवाजच करावा लागतो. यासारख्याच प्रसंगी व्हिला या फ्रेंच अराज्यवादी हुतात्म्याने काढलेल्या या अमर उद्‌गारांच्या आधारे आम्ही आमच्या कृत्याचे जोरदार समर्थन करीत आहोत. व्यक्तींना ठार मारणे सोपे आहे पण तुम्ही तत्त्वांना मूठमाती देऊ शकत नाही आणि मानवाचे मानवाकडून शोषण बंद होईल अशा खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्य प्रानीसाठी बलिदान चालू आहे. यावेळी कोणीही ठार झाले नाही. या कृत्याबाबत फाशी देता येत नसल्याने सरकारने या घटनेचा संबंध साँडर्स हत्येशी व लाहोर खटल्याशी जोडला आणि लाहोर खटल्यानुसार भगतसिंग, शिवराम हरी राजगुरू व सुखदेव उर्फ दयाळ यांना लाहोरमधील मध्यवर्ती तुरुंगात 23 मार्च 1931 रोजी फाशी देण्यात आली.

७. जतींद्रनाथ यांचे बलिदान

विधानसभेतील बॉम्बस्फोट बद्दल में 1929 मध्ये दिल्ली मध्यवर्ती कारागृहात सुनावणी सुरू झाली. आरोपीचे वकीलपत्र असफआली यांनी घेतले होते.

क्रांतीकारी जतींद्रनाथ दास - बालसंस्कार हिंदी

12 जूनला न्याधीशांनी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यानंतर लाहोर खटल्याची सुनावणी होणार होती. पण त्याआधीच राजकीय कैद्यांना तुरुंगात दिल्या जाणाऱ्या वाईट वागणुकीचा निषेध म्हणून भगतसिंग व दत्त यांनी 14 जूनला उपोषण सुरू केले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून उतींद्रनाथ दास यांच्यासह सर्व सहकाऱ्यांनी अन्नसत्याग्रह सुरू केला.

1 thought on “भारतीय राष्ट्रीय चळवळीतील क्रांतिकारी चळवळ”

Leave a Comment